शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:22 IST)

‘ओखी’ग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी : भास्कर जाधव

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव  यांनी ओखी वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि मच्छिमार बांधवांच्या व्यथा मांडल्या. तसेच त्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचेही मत व्यक्त केले.

जाधव म्हणाले की ओखी वादळामुळे कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण हे सरकार त्यांना मदत करण्याऐवजी उलटसुलट उत्तरे देत आहे आणि मूळ प्रश्न आणि मागणीला बगल देत आहे. ‘ओखीमुळे झालेल्या बोटीच्या नुकसानीला चार हजार रुपये मदत आणि फळपिकांना सहा ते सात हजार एकरी मदत देणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण ही मदत पुरेशी नाही. कोकणातील फळ पिकविम्यात बदल करावा, वाढती महागाई लक्षात घेता कोकणातील फळपिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख मदत देण्यात यावी. मच्छिमारांचे ‘एनसीडीसी’चे कर्ज माफ करावे आणि मच्छिमारी हा शेती व्यवसाय म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.