शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:06 IST)

सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर ते....

धनगर समाजाचे आरक्षण आणि इतर प्रश्नांचा या सरकारला विसर पडला आहे, सरकारला आठवण करून देण्यासाठी आज आ. जयंत पाटील  धनगराच्या वेषात सभागृहात दाखल झाले. जयंत पाटील यांच्या आजूबाजूला उभं राहण्यासाठी आमदार आणि अनेक मातब्बर राजकारण्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण धनगर वेषात कोणी राजकीय नेता विधानसभेच्या सभागृहात दाखल झाला.. महाराष्ट्रातील धनगर समाजाने या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, आपला कोणीतरी वाली या सभागृहात असल्याचा आनंद व्यक्त केला.

या सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारला धनगर समाजाचा विसर पडला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या वेशात आलो. काठी हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर धनगर समाज हीच काठी हातात घेईल, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला.