गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:51 IST)

निवडणुकीचा आनंद भाजपनं मागवले 'सामना' पथकाचे ढोल

narendra modi

विरोधातील शिवसेनेवर भाजप एकही टीकेची संधी सोडत नाही. आता निवडणुकीत यश मिळाले त्यासाठी भाजपाने इकडे महाराष्ट्रात 'सामनापथकाचे ढोल मागवून विजय साजरा केला आहे. शिवसेनचे मुखपत्र असलेल्या वृत्त पत्राचे नाव सामना आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल.’, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली आहे.

 यामध्ये शेलार म्हणतात की आम्ही विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी मुद्दामच सामना’ ढोल पथकाचे मागवले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागनार आहे अशी टीका त्यांनी केली .

निवडणुकीदरम्यान EVM, जीएसटीची अंमलबजावणीनोटाबंदी अशा मुद्दयांवरुन शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनातून भाजपवर या आगोदर टीका केली होती.