मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:09 IST)

हा तर जनतेचा मोदींवर असलेला विश्वास

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  जनता भाजपासोबत असून मोदींचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 
 
गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात  भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.