बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:15 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा : सुशील कुमार,साक्षी मलिकला सुवर्ण पदक

सुशील कुमारने जोहान्सबर्गच्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 
सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं.सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला अस्मान दाखवलं.

साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायला ट्यूहाईन फोर्डचा 13-2 असा धुव्वा उडवला.

या विजयानंतर बोलताना त्याने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ''तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे पदक मी आई-वडील, गुरु सतपाल जी पहेलवान आणि अध्यात्मिक गुरु योगऋशी स्वामी रामदेव आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो'', असं ट्वीट सुशीलने केलं.