शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 डिसेंबर 2017 (11:35 IST)

एअरटेलकडून 999 रुपयात हॉटस्पॉट

भारती एअरटेल कंपनीने फोरजी हॉटस्पॉट 999 रुपये इतक्‍या किमतीत उपलब्ध केला आहे. एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ग्राहकांना एकाच वेळी लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, टॅब्लेट्‌स, स्मार्ट उपकरणे जोडण्याची हाय स्पीड इंटरनेटला जोडण्याची मुभा देतो. त्यामुळे ग्राहकांना उत्तम सुविधा आणि लवचिकता प्राप्त होते. हे उपकरण पूर्णतः संरक्षित अशा नेटवर्कवरून सुरक्षित असा डेटा अनुभव देते. एअरटेल फोरजी हॉटस्पॉट एअरटेलच्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक लवकरच एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ऍमेझॉन इंडियावरूनही खरेदी करू शकतील.
 
भारती एअरटेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अजय पुरी म्हणाले, एअरटेलच्या देशभर पसरलेल्या प्रबळ हाय स्पीड डेटा नेटवर्कच्या बळावर एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ग्राहक कुठेही असताना दर्जेदार मल्टी-डिव्हाइस ऑनलाइन अनुभव देतो. एअरटेल फोरजी हॉटस्पॉटची सेवा चालू करण्यासाठी ग्राहकांना एअरटेल फोरजी सिम घ्यावे लागेल आणि ते विविध पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान्समध्ये गरजेनुसार प्लान निवडू शकतील. एअरटेल भारतातल्या सर्व 22 टेलिकॉम सर्कल्समध्ये फोरजी सेवा पुरवते. एअरटेलची फोरजी नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यास, एअरटेलचा फोरजी हॉटस्पॉट आपोआप थ्रीजी सेवेकडे वळतो जेणेकरून ग्राहकांना विनाव्यत्यय ऑनलाइन अनुभव मिळू शकेल.