गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विजेचा झटका घेऊन भागवतो भूक

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एक अनोखी व्यक्ती असून त्याची चक्क विजेसोबत अजब मैत्री आहे. त्याला विजेचा शॉक कधीच बसत नाही, उलट त्याच्या शरीरात वीज पळते.
 
एवढेच नाही तर तो विजेचे झटके घेऊनच आपली भूक भागवतो. नरेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे, मात्र या अनोखेपणामुळे लोक त्याला पॉवरमॅन म्हणूनच आवाज देतात. नरेश रोज सकाळपासून सांयकाळपर्यंत खाण्याऐवजी आपल्या शरीरावर विजेचे झटके घेतो व भूक भागवतो.
 
त्याच्या मते, विजेला स्पर्श केल्यानंतर त्याच्या शरीराला ऊर्जा मिळते व भूक लागत नाही. 42 वर्षीय नरेशला आपल्यातील अद्भूत शक्तीची एकदा चुकीने विजेच्या उच्च दाबाच्या तारेला हात लागल्यानंतर ओळख झाली होती. तारेला स्पर्श होऊनही त्याला काहीच झाले नव्हते.
 
काही वर्षांपूर्वी मेरठमधील एका रूग्णालयात तैनात असताना 1 हजार व्होल्टच्या विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आला होता. नरेश डॉक्टरांसोबत मृतदेहाची चिरफाड करत असताना त्याला एक जोरचा झटका बसला व तो मृतदेहापासून दूर जाऊन पडला. तेव्हापासून त्याच्या जीवनात एक नवे वळण आले.

त्या दिवसानंतर नरेश 440 व्होल्ट करंटच्या विद्युत ताराही उघड्या हातांनी जोडतो.