गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तीन तलाक पीडित महिलांसाठी आश्रम

लखनौ- तीन तलाक पद्धतीवर आपली रोखठोक भूमिका मांडणार्‍या महिलेला धर्माच्या ठेकेदारांनी माफीनामा सादर करण्यात भाग पाडत आहेत. तर दुसरीकडे तीन तलाक पीडित महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय यूपीच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. तीन तलाक पीडित ‍महिलेसाठी यूपी सरकार आता आश्रम उभारणार आहे.
 
योगी सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, यूपी सरकार विधवा महिलांप्रमाणेच तीन तलाक पीडित महिलांसाठी आश्रम उभारणार आहे. या आश्रमात पीडित मुस्लीम महिलांसाठी राहण्याची, जेवण्याची आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.