गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लग्न मंडपातून प्रेयसीने केले प्रियकराचे अपहरण

हमीरपूर- उत्तरप्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मोदहा क्षेत्रात एका तरुणीने लग्नाच्या मंडपातून प्रियकराचे अपहरण केले.
 
पोलिस सूत्रांप्रमाणे भवानीमध्ये त्यावेळी धावपळ सुटली जेव्हा लग्न समारंभात एक तरुणीने नवरदेवाला पिस्तूल दाखवून पळवले. रामसजीवन यादव यांच्या मुलाची वरात बांदा जिल्ह्याच्या महनपुरवा गावातून आले होती. एकमेकांना हार घालण्याची तयार होत असतानाच अचानक तिथे नवरदेवाची प्रेयसी धमकली आणि आपल्या प्रियकराला सोबत चलण्याची जिद्द करू लागली.

 
नवरदेवाने नकार दिल्यावर प्रेयसीने त्याच्या छातीवर पिस्तूल ताणली आणि साथीदारांच्या मदतीने त्याला स्कॉर्पियो वाहनात बसवले. लोकांना परिस्थिती समजेपर्यंत प्रेयसी नवरदेवाला घेऊन फरार झाली. हा प्रकार बघून वधू पक्षाने पोलिसांना सूचित केले. पोलिसाने नवरदेवाचा लहान भाऊ जयेन्द्र आणि कॅमरामॅन रामनाथ या दोघांना धरून नेले. आता प्रकरणाची चाचणी सुरू आहे.