मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिनकडून 90 लाख पंतप्रधान सहायता निधीत जमा

क्रिकेटपटू आणि  भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यानं खासदार म्हणून मिळणारं, वेतन तसंच भत्ते यांची रक्कम, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे.

राज्यसभा खासदार म्हणून सहा वर्षांच्या कार्यकाळातलं वेतन आणि इतर भत्ते, अशी एकंदर सुमारे 90 लाखांची रक्कम सचिन तेंडुलकरनं पंतप्रधान सहायता निधीसाठी दिली आहे. सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.