क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे पाच काळी पानं
दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघ बॉल टॅम्परिंग प्रकरणात फसली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर, कॅमरन बॅनक्रॉफ्टला आयसीसी यांनी बॉल टॅम्परिंगचे दोषी करार देत शिक्षा ठोठावली आहे. असे पहिल्यादांचे नव्हे तर यापूर्वीही अनेकदा अश्या कृत्यांमध्ये लिप्त आढळले आहेत.
1. बॉल टॅपरिंग : दक्षिण आफ्रिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात टेस्ट केपटाउन टेस्ट मध्ये घडलेले प्रकरण क्रिकेट जगासाठी मोठा धक्का आहे. आयसीसीने बॉल टॅपरिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्टला दोषी मानले आहे. अंपायराची नजर यावरून चुकली असली तरी कॅमर्यात हे कॅप्चर झाल्यामुळे पोल पटटी उघडकीस आली.
2. वॉर्न डोप टेस्ट : वर्ल्ड कप 2003 दरम्यान शेन वॉर्न प्रतिबंधित औषध सेवन केल्या प्रकरणी पॉजीटिव्ह सापडले होते. या प्रकरणाची खूप चर्चा रंगली आणि वॉर्नवर एका वर्षासाठी बॅन लावण्यात आले होते. वॉर्न वर्ल्ड कपहून बाहेर झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खूप बदनामी झाली होती.
3. अंडरऑर्म बॉलिंग : फेब्रुवारी 1981 ला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि न्युझॅलँड यांच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चैपल यांनी आपल्या भावाला अर्थात ट्रेवर चैपलला सामन्याची शेवटली बॉल अंडरआर्म टाकायला सांगितली. हे क्षण क्रिकेट इतिहासातील सर्वात लज्जास्पद क्षणांपैकी आहे. न्युझॅलँडला एक बॉलवर सहा धावांची आवश्यकता होती आणि पराभवानंतर न्युझॅलँडने खूप हल्ला केला होता.
4. मंकीगेट केस : 2008 साली भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असताना मंकीगेट प्रकरण घडले होते. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर मायकल क्लार्कने सौरव गांगुलीचा कॅच लपकला. यावर वाद घडला. ऑफ स्पिनर हरभजन सिंह आणि एंड्रयू सायमंडस यांच्यात खूप वाद झाला आणि प्रकरण चिघळले.
5. होमवर्कगेट प्रकरण : होमवर्कगेट प्रकरण चर्चेत राहिले. भारत दौर्यावर ऑस्ट्रेलियन संघाची दोन टेस्टमध्ये पराभवानंतर शेन वॉटसन, मिशेल जॉन्सन, जेम्स पॅटीन्सन आणि उस्मान ख्वाजा यांना संघातून बाहेर काढण्यात आले. यात खेळाडू आणि कोच यांचे आपसातील मतभेद समोर आले होते.