शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारताच्या विजयामुळे श्रीलंकन क्रिकेटप्रेमी झाले शांत

श्रीलंकन क्रिकेटप्रेमींनी बांगलादेश टीमला आरसा दाखवला, आता पुढे असली कुठलीही वाहियात कृत्य घडणार नाही अशी उमेद आहे.
 
शुक्रवारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामान्यात घडलेला प्रकार कोणत्याही आयोजक देशाच्या क्रिकेटप्रेमींना त्रस्त करण्यासाठी पुरेसं होतं. आपल्या खेळाडूंसोबत झालेल्या व्यवहार आणि बांगलादेशी क्रिकेटर्सच्या कृत्यामुळे श्रीलंकन समर्थक रागात होते. उल्लेखनीय आहे की या मॅचमुळे सर्व हैराण झाले होते कारण शेवटला ओव्हर ड्रामापेक्षा कमी नव्हता. आधी मॅच थांबवण्यात आला नंतर बांगलादेशाच्या खेळाडूंना वॉक आऊट करण्यासाठी सांगण्यात आले, मॅच सुरू झाला, बांगलादेशाने मॅच जिंकला नंतर पुन्हा दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये भांडणं सुरू झाले.
 
काय झाले होते जाणून घ्या:
शेवटल्या ओव्हरमध्ये बांगलादेशाला जिंकण्यासाठी 6 बॉल्सवर 12 रन हवे होते. इशुरु उडाना बोलिंगं करत होते. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाउंसर झालं आणि रन नाही. दुसर्‍या बॉल पुन्हा बाउंसर आणि खेळाडू रन आऊट. ज्यामुळे बांगलादेशी कर्णधार शाकिब-अल-हसन नाराज झाले. त्यांना वाटले की साइट अंपायराने नो बॉल दिली परंतू स्टम्प्सजवळ उभे असलेल्या अंपायराने नो बॉल दिली नव्हती. ज्यामुळे ते भडकले आणि बॉलर्सला वापर बोलवू लागले. मॅच थांबला आणि प्रकरण शांत झाल्यावर पुन्हा सुरू करण्यात आला. 4 बॉल्सवर 12 रन हवे होते. तिसर्‍या बॉल वर चार रन बनले. आता बांगलादेशाला 2 बॉल्सवर 6 रन हवे होते. ज्यानंतर पाचव्या बॉलवर माहमुदुल्लाह यांनी छक्का मारून मॅच जिंकला.
 
बांगलादेश यावर संतुष्ट झाला नसून जिंकल्यावर सर्व खेळाडूंनी ग्राउंडवर नागीण डांस केला. नंतर बांगलादेशी खेळाडू श्रीलंकन खेळाडूंशी भिडले. स्थिती एवढी बिघडली की श्रीलंकन खेळाडू बांगलादेशी खेळाडूंना मारण्यासाठी त्यांच्यामागे धावू लागले. नंतर बांगलादेशी फलंदाज तमीम इकबाल मधे पडले आणि खेळाडूंना शांत केले.
 
यामुळेच मेजबान प्रशासकांनी फायनल मॅचमध्ये स्वाभाविक अंदाजात वचपा काढण्याचा मन तयार केले. त्यांच्या आत्म्याला संतु‍ष्टी मिळेपर्यंत त्यांनी वचपा काढला.
 
याअंतर्गत श्रीलंकन क्रिकेट चाहते फायनल सामन्यात हातात तिरंगा घेऊन स्टेडियममध्ये जमा झाले. त्यांनी बांगलादेशी खेळाडूंची जोरदार हूटिंग केली आणि टीम इंडियाच्या प्रत्येक स्टाइलवर जमून कौतुक केले. आणि जेव्हा कार्तिक ने शेवटला विजयी छक्का लावला तर स्टेडियममध्ये भारताला समर्थन देण्यासाठी गोळा झालेले हजारो चाहत्यांची मनोकामना पूर्ण झाली.
 
नंतर श्रीलंकन समर्थकांनी भारतीय लोकांसोबत मिळून मैदानावर धमाल केली. आता यामुळे बांगलादेशी खेळाडूंना हे स्पष्ट कळून आले असेल की स्पर्धा जिंकण्यापेक्षा हृदय जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे.