शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारताने निदाहास चषक जिंकला

भारताने निदाहास चषक जिंकला. श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये कार्तिकने भारताकडे विजय खेचून आनला.  झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं 56 धावांची निर्णायक खेळी केली. 42 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने त्यानं आपले 16 व्यांदा 50 पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. यावेळी त्याने गेल आणि मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडित काढला. आता त्याच्यापुढे फक्त विराट कोहली आहे. विराट कोहलीने टी-20मध्ये 18 वेळा हा पराक्रम केला आहे. तसेच या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचा गेल तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 15 वेळा अशी कामगिरी केली आहे.
 
रोहित शर्मानं  सामन्यात टी--20मध्ये सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर भारताचा तिसराच  खेळाडू ठरला.  याआधी भारताकडून विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे.सामन्यात 26 वी धाव घेताच रोहित शर्मा सात हजार धावा करणारा भारताचा तिसरा तर जगातला दहावा फलंदाज बनला.   या यादीत वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज गेल प्रथम स्थानावर आहे. गेलने 11068 धावा केल्या आहेत.