थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्या एका फेसबुक युझरला चांगलंच उत्तर दिलं. हे ट्वीट म्हणजे थट्टा असल्याचं शोएबने सांगितलं.
"वाईट बातमी, एका फळांच्या दुकानाजवळून जाताना शोएब अख्तरचं (रावळपिंडी एक्स्प्रेस) वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं," अशी पोस्ट एहसान कमाल पाशा नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर केली होती. याबाबत शोएबला समजल्यानंतर त्याने ट्वीट करुन उत्तर दिलं. फळांच्या दुकानाजवळून मी रोज जातो. "थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा," असं ट्वीट शोएब अख्तरने केलं आहे.
शोएब अख्तरने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शोएब सध्या पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजांचा मेंटॉर बनला आहे. शिवाय तो सामाजिक कार्यही करतो.