मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शब्दांचा हल्ला केला. त्यांनी म्हटले की विरार येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करताना योगी यांनी आपले खडाऊ काढले नाही म्हणून त्यांना चपलांनी मारायला हवे.
 
ठाकरे यांनी म्हटले की ईश्वराचे प्रतिरूप शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमक्ष जाण्यापूर्वी चप्पल काढणे हे त्यांच्याप्रती सन्मान प्रकट करणे आहे आणि ही अगदी सामान्य प्रक्रिया आहे परंतू योगींनी असे केले नाही. शिवाजींप्रती योगींना आदर नाही हे स्पष्ट कळून येतं आणि आता त्यांच्याकडून अजून कुठली अपेक्षा केली जाऊ शकते? हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे.
 
तसेच एका मराठी चॅनलच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की भाजपच्या तरुण पिढीत हिंदुत्वाचे आदर्श दिसत नाहीत. त्यांनी म्हटले की सत्तेवर आल्यानंतर भाजप अहंकारी झाली आहे. 28 तारखेला पालघर लोकसभा उप निवडणूक अहंकार आणि निष्ठा यात असेल.
 
या दरम्यान शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यासाठी धनाऊ येथे प्रचार रॅलीला संबोधित करत ठाकरे यांनी म्हटले की त्यांचा पक्ष 25 वर्षांपर्यंत हिंदुत्वासाठी भाजपसोबत राहिला. बाळासाहेबांनी यांना (भाजपचे वाईट काम) सहन केले. आम्ही हे खूप केले पण आता यांना सहन करणार नाही.