शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (17:05 IST)

'लाल सिंह चड्ढा' नंतर आमिरने पूर्ण केले या चित्रपटाचे शूटिंग

लाल सिंग चड्ढा' या शेवटच्या चित्रपटासाठी सोशल मीडियावर सतत अडचणीत सापडलेला अभिनेता आमिर खानने त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात आमिर तिसर्‍यांदा त्याची खास मैत्रीण काजोलसोबत पडद्यावर दिसणार आहे. आमिर खान आणि काजोल यापूर्वी 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'इश्क' आणि 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'फना' सिनेमात दिसले होते. काजोल आणि आमिर खानच्या या नवीन चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सध्या जोरात सुरू आहे, मात्र आमिरला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर ज्याप्रकारे विरोध सहन करावा लागत आहे, त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते अडचणीत आले आहेत.
 
1991 साली सलमान खानसोबत 'लव्ह' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रेवतीने काजोल आणि आमिर खानचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून बनवला आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांची एक नामांकित अभिनेत्री रेवती हिंदी चित्रपटसृष्टीत 'रात', 'स्माइल्स', 'धूप', 'डरना मना है', 'अब तक छप्पन', 'निशब्द' ,आणि 2'स्टेट्स' सारखे  प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून दिसली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेजर' चित्रपटात ती शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.