गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (10:06 IST)

'पठाण' नंतर दीपिका पदुकोणही दिसणार शाहरुखच्या आगामी चित्रपटात

अभिनेत्री दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 'पठाण' या चित्रपटासाठी पुन्हा एकदा दोघे एकत्र आले. किंग खान आणि दीपिका पदुकोणला स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, 'पठाण' चित्रपटानंतर दीपिका शाहरुख खानच्या आणखी एका आगामी चित्रपटात एन्ट्री करणार असल्याची बातमी येत आहे.
 
पठाण या चित्रपटाच्या टीझरमध्ये दीपिका पदुकोणची दमदार स्टाईल पाहायला मिळाली आहे, ज्यावरून ती या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. रिपोर्टनुसार पठाण चित्रपटानंतर दीपिका पदुकोण किंग खानच्या 'जवान'मध्ये देखील दिसणार आहे.
 
शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, अभिनेता शाहरुख त्याच्यासोबत 'जवान'मध्येही काम करत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहरुख खान आणि चित्रपट निर्माते एटली यांच्याशी दीपिकाला जवानमध्ये कास्ट करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री या चित्रपटात छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात बैठका होत असून त्यामध्ये भूमिका आणि तारखांवर चर्चा होत आहे.
 
'जवान' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान व्यतिरिक्त राणा डग्गुबती, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा, नयनतारा हे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.