सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 28 जून 2022 (17:42 IST)

थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांचा पठाणकोटमध्ये मृत्यू

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना दोन जवानांमध्ये आपापसात फायरिंग झाले होते, यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावांसह तालुक्यात शोककळा पसरली आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर माध्यमिक शिक्षण रापका येथे झाले. घरची परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी पुढील शिक्षण घेणे टाळले व दशसेवा करण्यासाठी सैन्य भरतीत जाण्याची तयारी सुरू केली.