1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (17:18 IST)

अभिषेकसोबत घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याचा पूर्णविराम!

Aishwarya Abhishek relationship
गेल्या काही दिवसांत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार अशा बातम्या चर्चेत होत्या. मात्र या वर कोणतीही प्रतिक्रिया दोघांनी दिली नव्हती. आता या दोघांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला असून दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
त्यांचा एक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला आहे ह्या मध्ये ते एकत्र आहे. हा व्हिडीओ प्रो कबड्डी लीगचा आहे. या मध्ये ऐश्वर्या पती अभिषेक आणि मुलगी आराध्य सोबत दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये बिग बी अमिताभ बच्चन देखील दिसत आहे. ऐश्वर्या अभिषेकची टीम  जयपूर पिंक पँथर्सला सपोर्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्स इंडियाने शेअर केला असून या मध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब पिंक पँथर्सची जर्सी घातलेली आहे.संपूर्ण बच्चन कुटुंब टीमला चिअर करताना दिसत आहे. या वर स्टार स्पोर्ट्स ने लिहिले आहे की बच्चन मॅच बघायला आले आणि पिंक पँथर्सने मॅच जिंकली. या पूर्वी देखील अभिषेक आणि ऐश्वर्या आराध्याच्या शाळेत कार्यक्रमाला एकत्र गेलेले दिसले होते. 
 
 Edited By- Priya Dixit