शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (20:57 IST)

नाशिक: एमडी ड्रग्‍ज कारखाना उभारणीसह विक्रीत हरिशपंतचा सहभाग उघड

drugs
‘एमडी’ (मेफड्रोन) च्‍या उत्‍पादनासाठी शिंदे गावात कारखान्‍याच्‍या उभारणीत मुंबईतील संशयित हरिशपंतचा सहभाग चौकशीतून उघड झाला आहे.पोलिस कोठडीत असलेल्‍या मुख्य सूत्रधार ललित पाटील (पानपाटील) याच्‍या चौकशीत आणखी विविध खुलासे होत असून, रॅकेट उद्ध्वस्त करण्यासह दोषींवर कारवाईसाठी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.पोलिस कोठडीतील सर्वच संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
 
या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी ललितसह त्याचा भाऊ भूषण पाटील (पानपाटील), अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, हरिशपंत, शिवा शिंदे, झिशान शेख यांना गजाआड केले आहे.
 
शिंदे गाव येथे एमडीचा कारखाना उभारण्यात हरिशपंतने मदत केल्‍याचे उघड झाले आहे. यंत्रसामग्रीसह कच्चा माल पुरवण्यात त्‍याचा हात होता.
 
तसेच संशयित रोहितला नाशिकच्या कारखान्‍यात एमडी ड्रग्‍जच्‍या उत्‍पादनासाठी ठेवले होते, हेही तपासातून समोर आले आहे.
दरम्‍यान, एमडी ड्रग्‍ज उत्‍पादनासाठी आवश्‍यक असलेले सूत्र (फॉम्युला) कोठून प्राप्त झाला, भांडवल कुणी पुरवले, याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor