1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (21:09 IST)

ललित पाटीलसह तिघा संशयितांना 18 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी

lalit patil
पुण्याच्या ससून रुग्णालयातून  एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रूग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटीलसह तिघा संशयितांना शनिवारी नाशिकच्या अमली विरोधी पथकाने जिल्हा व सत्र न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायाधीश लोकवाणी यांनी चौघांना येत्या सोमवारपर्यंत (दि.18) पोलीस कोठडी दिली.
 
एमडी ड्रग्ज व ससून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेला मूळ नाशिकचा रहिवासी असलेला संशयित ललित पाटील आता नाशिक ‘मुक्कामी’ आहे. त्याचा नाशिक पोलिसांच्या कोठडीतील मुक्काम आता 10 दिवसांपर्यंत न्यायालयाने निश्चित केला आहे. शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने घेतला. त्यांना चोख बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत नाशिकला आणण्यात आले. शनिवारी (दि.9) पोलिसांनी या चौघांसह शिवाजी शिंदे याला ही न्यायालयात हजर केले.  
 
न्यायालयाने शिंदे यास न्यायालयीन कोठडी मंजुर केली।  मात्र ललित, रोहित, जिशान आणि हरिशपंत या चौघांना थेट 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारीपक्षाकडून अभियोक्ता पंकज चंद्रकोर यांनी युक्तीवाद करत या चौघांची पोलीस कोठडीची गरज नाशिक पोलिसांना आहे, कारण हे चौघे पहिल्यांदाच नाशिक पोलिसांच्या ताब्यात मिळाले आहे, असे सांगितले. न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती बघता चौघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor