बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अजय देवगणची मुलगी न्यासा आजोबांच्या निधनानंतर सलोनमध्ये गेल्यामुळे झाली ट्रोल

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ड्रेसअपमुळे तर कधी लुक्समुळे. पण आता ट्रोल होण्याचे कारण जरा वेगळेच आहे. 
 
अजय देवगणचे वडिल म्हणजे न्यासाचे आजोबा वीरु देवगण यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले. आजोबांच्या निधनानंतर लगेच दुसर्‍या दिवशी न्यासा सलोनच्या बाहेर दिसली. आणि एकाने तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात ती स्टाइलिश दिसत असली तरी हा फोटो बघताच सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.
 
आजोबांचे निधन नुकतेच झाले असताना ती सलोनला का गेली तसेच स्टार किड्स फार प्रेक्टिल असतात त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रती भावना नसतात असे कमेंट्स येऊ लागले.
 
तरी हा फोटो निधनाच्या दुसार्‍या दिवशी पोस्ट केला असला तरी फोटो कधीचा आहे हे मात्र स्पष्ट नाही. अशात हा फोटो कधीचा आहे असे प्रश्न देखील विचारण्यात आले आहे. कारण हा फोटो तिने नव्हे तर एका इतर व्यक्तीने पोस्ट केला आहे.
 
वीरू देवगण हे अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून ओळखले जात होते. त्यांचे नुकतेच निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.