बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (17:01 IST)

ऊर्मिला मातोंडकर पराभूत, गोपाळ शेट्टींनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा पराभव करत गोपाळ शेट्टींनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यांनी ऊर्मिला मातोंडकरांचा 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 
 
गोपाळ शेट्टी यांना 6 लाख 13 हजार 288 एवढी मतं मिळाली आहेत. तर ऊर्मिला मातोंडकर यांच्या पारड्यात 195147 मतं पडली आहे. 
 
पराभवानंतर ऊर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की माझ्यावर विश्वास दाखवलेल्या लोकांचे मी आभार मानते. मी पराभूत झालेली नाही, मला याचे दु:ख नाही. मी मला पाठिंबा देणार्‍या लोकांची आभारी आहे आणि मी राजकारणात कायम राहीन.
 
उल्लेखनीय आहे की ऊर्मिला मातोंडकर यांचा निवडणुकापूर्वीच राजकारणात प्रवेश झाला असून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांनी आपल्या ग्लॅमरने गोपाळ शेट्टी यांच्यापुढे तगडं आव्हान दिले होते. त्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळे सगळ्याचं लक्ष या जागेवर होतं. परंतू अखरे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी खुल्या मनाने भाजपाला त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.