रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (12:21 IST)

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री 22 वर्षानंतर भन्साळीसोबत शूटिंगला सुरुवात करणार आहे

बॉलीवूड चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेता अजय देवगण आजपासून शूटिंग करणार आहे. बातमीनुसार अजय 10 दिवस भन्साळी सोबत शूट करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे की 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या 22 वर्षानंतर अजय देवगन आणि संजय लीला भन्साळी यांची जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अजय देवगन आणि आलिया भट्ट एकत्र दिसल्याने चाहते उत्साही आहेत.
 
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अजय देवगन प्रसिद्ध गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो गंगूबाई काठियावाडीला आपली बहीण मानत असे. जेव्हा सर्वांनी गंगूबाईंना दडपण्याचा प्रयत्न केला तेव्हा करीम लाला गंगूबाईंसोबत उभे राहिले.
 
या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईच्या प्रभावी भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
अजय देवगन आजकाल बॅक टू बॅक चित्रपटात दिसणार आहेत. मैदान, आरआरआर, कॅथी रीमेक, चाणक्य, सिंघम 3,, गोलमाल 5 आणि भारत- चीनवरील तणावावर एक चित्रपटही आहे.