शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जेव्हा अक्षय ने कॅटरीनाला म्हटले, चापट मारेन

अक्षय कुमारने कॅटरिना कैफसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या जोडप्याला लोकांनी खूप प्रेमही दिले. पण एकदा अक्षय आणि कॅटमध्ये असे काही झाले होते की अक्षयने म्हटले होते की चापट मारू का?
करण जोहरच्या कॉफी विद करण शोमध्ये कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माने खूप गप्पा मारल्या. दोघींनी जब तक है जान या चित्रपटात बरोबर काम केले होते.
 
कॅटने सांगितले की एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी तीस मार खाँ या सिनेमासाठी ती शीला की जवानी गाणं शूट करत होती. त्या दिवशी अनेक लोकांच्या हातावर राखी बांधलेली होती. कॅटला खूप वाईट वाटतं होतं की तिने कोणालाही राखी बांधलेली नाही. म्हणून तिने अक्षय कुमारला विचारले की तू माझा राखी भाऊ होशील का? त्यावर अक्षयने थट्टा करत म्हटले की कॅटरिना चापट मारू का?
 
हा किस्सा आठवून कॅटरिना खिदळून हसू लागली.