मेड इन इंडिया FAU-G गेम लॉंच
बॉलिवूड अॅक्शन हीरो अक्षय कुमारने FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला आहे. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम असून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात लॉंच करण्यात आला आहे.
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर या गेमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. “FAU-G Fearless and United Guards. शत्रुचा सामना करा. आपल्या देशासाठी लढा. आपल्या ध्वजाचे संरक्षण करा. Fearless and United Guards – FAU-G हा गेम आपल्याला फ्रंटलाइन आणि त्यापलीकडे नेईल! तुमच्या मिशनची सुरूवात आज करा.” अशा आशयाच कॅप्शन अक्षयने त्या गेमचा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि अक्षयने डेव्हलप केला आहे. FAU-G हा गेम PUBG या गेम सारखा आहे.