मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (18:43 IST)

भारताच्या नकाशावर पाऊल ठेवल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल

Bollywood actor Akshay Kumar trolled for stepping on India's map
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच चर्चेत राहतो. सध्या तो त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अक्षय कुमार सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. अक्षयने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'नॉर्थ अमेरिका टूर'च्या या प्रमोशनल व्हिडिओमध्ये अक्षय भारताच्या नकाशावर चालत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 
 
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेह त्याच्यासोबत पृथ्वीवर फिरताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, "मनोरंजक उत्तर अमेरिकेत 100% शुद्ध स्वदेशी मनोरंजन आणण्यासाठी सज्ज आहेत. बसून राहा, आम्ही मार्चमध्ये येत आहोत!"