Marathi Biodata Maker

'ब्रह्मास्त्र' बाबत उत्साहित

शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (00:01 IST)
आलिया भट्ट सध्या 'ब्रह्मास्त्र' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतलेली आहे. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग बल्गेरियात झाले. हा चित्रपट भारतीय चित्रपटांना पुढच्या स्तरावर नेईल, असे आलियाने म्हटले आहे. येथील 'ईस्ट ग्रीटस्‌ वेस्ट : एक कन्व्हर्सेशन थ्रू कॅलिग्राफी'च्या प्रीव्ह्यूमध्ये आलियाने  'ब्रह्मास्त्र'बाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, या चित्रपटाबाबत आम्ही सगळेच अतिशय उत्साहित आहोत. मला वाटते की हा चित्रपट भारतीय चित्रपटांना पुढच्या स्तरापर्यंत नेईल आणि पुढील वर्षी होणार्‍या त्याच्या प्रदर्शनाबाबत मी आतापासूनच उत्सुक आहे. हा चित्रपट ट्रायलॉजी आहे. आलियाच्या या चित्रपटात 'नागिन' फेम मौनी रॉय आणि दाक्षिणात्य स्टार नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. पुढील वर्षी 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

अटारी सीमेवर 'जय हो'चा गजर होणार, ए. आर. रहमान बीएसएफला संगीतमय आदरांजली वाहणार

अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन

''सिंधुदुर्ग'' महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पुढील लेख
Show comments