सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (11:01 IST)

अमिताभ बच्चन यांची नात आराध्याने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका, जाणून घ्या कारण

Aishwarya Rai Bachchan and Aaradhya
अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन अवघ्या 11 वर्षांची आहे. तिचे अनेकदा तिच्या आईचा हात पकडून चालताना असे फोटोज आणि व्हिडिओज बघायला मिळतात. ज्यामुळे ती अगदी लहान क्यूट अशी मुलगी दिसते, परंतु आराध्याने असे काम केले आहे, ज्यामुळे तुम्ही देखील म्हणाल की ती समजाच्या बाबतीत लहान नाही. चुकीचा कंटेंट देणाऱ्या 2 यूट्यूब चॅनल आणि 1 वेबसाईट विरोधात तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
गुरुवारी सुनावणी होणार आहे
होय! स्टार कपल अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चनच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात एका यूट्यूब चॅनलविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. खरं तर आराध्या बच्चनच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की या यूट्यूब चॅनलवर तिच्या आरोग्याबाबत काही खोटी माहिती सतत दाखवली जात आहे.
 
आराध्या खूप प्रसिद्ध आहे
आराध्या ही बॉलीवूड स्टार किड्समध्ये लोकप्रिय स्टार किड आहे. तिचा कोणताही फोटो समोर येताच तो व्हायरल होतो. ती नियमितपणे तिची आई ऐश्वर्या राय बच्चनसोबत विमानतळावर पाहिली जाते. यादरम्यान तिने आईचा हात धरलेला असतो यावरून देखील ऐश्वर्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आले. मात्र ऐश्वर्याने अशा गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्याच वेळी 11 वर्षीय आराध्याने पहिल्यांदाच तिच्याबद्दल खोट्या बातम्या सांगणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
 
आराध्या ही स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची एकुलती एक मुलगी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केले. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.