गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (21:48 IST)

गौतमी ने एका मुलाखतीत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे या प्रश्वाचे मजेशीर उत्तर दिले

तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. आधी अश्लील नृत्य केल्याने तिच्यावर टीका झाली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत: नाराजी दर्शवल्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. नृत्यात सुधारणा करेल असं तिने म्हटलं होतं. यानंतर गौतमीची क्रेझ वाढतच गेली. आज गावागावात तिचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. नुकतेच तिने एका मुलाखतीत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे या प्रश्वाचे मजेशीर उत्तर दिले.
 
गौतमीने 'दॅट ऑड इंजिनिअर' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये गौतमीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिचं बालपण कसं गेलं, शिक्षण किती झालं, तिच्या आवडी निवडी काय, लग्न कधी करणार अशा अनेक प्रश्नांची गौतमीने दिलखुलास उत्तरं दिली. तर काही रॅपिड फायर प्रश्न विचारुन तिची कोंडीही करण्यात आली. रॅपिड फायरमधलाच एक प्रश्न असा होता 'एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे' दोन्हीपैकी एक निवडायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र गौतमी गोंधळली आणि तिने उत्तर देणं टाळलं. गौतमी हसतच पुढे म्हणाली, 'तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार'. तिने असं म्हणताच एकच हशा पिकला.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor