गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (18:05 IST)

अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज झाली त्यात शेतकऱ्याच्या हितासाठी काही निर्णय घेण्यात आले. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट आले असून  या  संकटातून काढण्यासाठी शिंदे सरकारने मोठे पाऊले घेतले असून शेतकऱ्यांना मदत  करण्यासाठी सततचा अवकाळी पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. 10 मिलिमीटरहून अधिक पाऊस सतत पाच दिवस पडल्यास त्याला नैसर्गिक आपत्ती म्हटली जाणार. मदत व पुनर्वसन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सलग पाच दिवस सतत पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं होणाऱ्या नुकसानीसाठी मदतीचा हात म्हणून दिला जाणारा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात आणखी काही बदल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतल्यावर जाहीर करण्यात येईल. या प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्याच्या मदत म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर अंतिम निर्णय लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. 
 
Edited By - Priya Dixit