रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (07:51 IST)

मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या डवरे यांचे अखेर निधन

मुंबई -   मंत्रालयासमोर विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसाच्या पत्नी संगीता डवरे यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्या दोषी डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी तक्रार संगीता यांनी केली. मात्र सरकार दरबारी खेटे घालून सुद्धा पदरात निराशा पडत असल्याने अखेर त्यांनी  २७ मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी  बीड येथील शीतल गादेकर आणि पुण्याचे दिव्यांग रमेश मोहिते यांनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात शीतल यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर संगीता डवरे व रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र  संगीता यांचे निधन झाले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor