सप्तश्रृंगी गडावर चढताना भाविकांचा मृत्यू
सध्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सव सुरू असून लाखो भाविक दर्शनासाठी गडावर जात आहेत. त्यात आता एक वाईट बातमी समोर आली आहे म्हणजे मातेच्या दर्शनसाठी निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी सोमर आली आहे. ते दोघेही दर्शनासाठीी गडावर जात होते.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावर रविवारी रात्री ही घटना घडली आहे. दोन भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. रात्रीच्यावेळी अंधारात गड उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी गडावर असलेल्या विहिरीला कठडा नसल्याने दोघांना खाली विहीर असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते थेट विहरीत पडले व त्यांचा मृत्यू झाला.