बच्चन यांनी ट्वीटमध्ये लिहले आहे कि, माझी एक योजना संपली असून आताच ‘१०२ नॉट आउट’च्या शुटींगवरून परत आलो आहे. आणि आता पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. या चित्रपटाला उमेश शुक्ला दिग्दर्शित करीत असून यामध्ये अमिताभ ‘१०२ वर्षाच्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ऋषी कपूर बच्चन यांच्या ७५ वर्षीय मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.