मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (09:18 IST)

यंदा बिग बी सेलिब्रेशन करणार नाही

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. मात्र बिग बी यांनी यंदा आपण कोणतेच सेलिब्रेशन करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी चाहत्यांना ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच  यावर्षी दिवाळी साजरी करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण ते दिवाळी साजरी का करणार नाहीत याचे कारण गुलदस्त्यात आहे.  चाहत्यांना ब्लॉगमधून, ‘माझ्या ७५ व्या वाढदिवसाला कोणतेच सेलिब्रेशन नसेल, मी त्या दिवशी शहरातच असेन अशी माहिती दिली आहे. 

याआधी बिग बी यंदा कुटुंबासोबत मालदिवला वाढदिवस साजरा करणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. पण या बातम्या खोट्या असून कोणी, असे काहीही सेलिब्रेशन होणार नसल्याचे बिग बींनी म्हटले आहे.