मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (11:51 IST)

अमिताभ-हेमा मालिनी पुन्हा “वादी-ए-कश्‍मीर’मध्ये एकत्र

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या काश्‍मीरमध्ये सध्या वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे अशांतता पसरली आहे. काश्‍मीरची प्रतिमा सुधारण्यासाठी केंट आरओ द्वारा प्रस्तुत आणि लॉ एंड केनेथ ऍण्ड साची द्वारा एक लघुपट तयार करण्यात आला आहे. या लघुपटात “शोले’ चित्रपटातील सुपरिहिट कलाकार अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे काश्‍मीरमधील वास्तव परिस्थितीबाबत देशवासियांना आवाहन करत आहेत.
 
दिग्गज चित्रपट निर्माता प्रदीप सरकारा द्वारा दिग्दर्शित 6 मिनीटांच्या या लघुपटात काश्‍मीर आणि भारतातील अन्य राज्य जोडण्याचा एक सुंदर असा यशस्वी प्रयोग साकारण्यात आला आहे. हा लघुपट काश्‍मीरमध्ये 2 आठवड्यांच्या कालावधीत चित्रित करण्यात आला आहे. तसेच अमिताभ बच्चन यांनीही या शॉर्ट फिल्मचा काही भाग ट्‌विट केला आहे.
 
केंट आरओने सामजिक बांधिलकी दाखवत काश्‍मीच्या निसर्ग सौंदर्याशी प्रेक्षकांना अंतर्मुख केले आहे.
 
ही शॉर्ट फिल्म पाहताना प्रेक्षकांना स्वर्ग सुखाचा अनुभूती मिळते. निसर्ग सौंदर्याची ही अनुभूत मिळवण्यासाठी काश्‍मीरला भेट देण्याचे आवाहन यामधून करण्यात आले आहे. तसेच काश्‍मीरचा अपप्रचार थोपवताना, काश्‍मीच्या वैभवाविषयी यातून माहिती देण्यात आली आहे.