अमिताभ-जयाचे 48 वर्ष, प्रसिद्ध जोडप्याची प्रेम कहाणी
सिमी गैरेवाल यांच्या चॅट शोमध्ये अमिताभने आपल्या आणि जयाच्या पहिल्या भेटीची आणि प्रेमकथेविषयी सांगितले होत. बिग बीने पहिल्यांदा जयाला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर पाहिले. जयाला मासिकावर पाहिल्यानंतर अमिताभ खूप प्रभावित झाले.
अमिताभ यांनी सांगितले की त्यांना नेहमीच अशी मुलगी हवी होती जी आतून पारंपारिक आणि बाहेरून आधुनिक असेल. जया तशीच होती. जयाचे डोळे बघून अमिताभ इंप्रेस झाले होते. बर्याच काळानंतर हृषीकेश मुखर्जी 'गुड्डी' चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अमिताभकडे आले.
अमिताभ सोबत यात जयाला कास्ट केले गेले. अमिताभ, जयासोबत काम करण्यास खूप उत्सुक होते. जया यांनी सांगितले की त्यांच्याकडून लव्ह एट फर्स्ट साइट नव्हतं. त्यांनी 1970 मध्ये अमिताभ यांना प्रथमच पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले होते.
अब्बास आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपसमवेत ते तिथे आले होते. अमिताभची पर्सनालिटी जया यांना पसंत होती. तेव्हा अमिताभ स्ट्रगल करत होते परंतु जया स्टार होत्या. नंतर जेव्हा याची गुड्डी च्या सेटवर भेट झाली तर ते चांगले मित्र झाले.
'गुड्डी' नंतर दोघे 'एक नजर' चित्रपटात सोबत दिसले. या शूटिंग दरम्यान यांच्यात प्रेम कहाणी सुरु झाली होती. 'जंजीर' चित्रपट करताना दोघांच्या लव्ह स्टोरीत एक टि्वस्ट आलं. दोघांच्या कॉमन फ्रेंड्सने म्हटलं की चित्रपट हिट झाला आहे म्हणून सर्व लंडन फिरायला जाऊ या.।
अमिताभचे वडील हरिवंश राय बच्चन यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी दोघांनाही पाठविण्यास नकार दिला. ते म्हणाले की, अमिताभ लग्न केल्याशिवाय कोणत्याही मुलीबरोबर बाहेर जाणार नाही. मग अमिताभने जयाला लग्नासाठी प्रपोज करण्याचा विचार केला.
अमिताभने प्रपोज केल्यानंतर जयाने त्याला हो म्हणायला उशीर केला नाही. दोघांच्या कुटुंबियांनीही या नात्यास मान्यता दिली. मग 3 जून 1973 मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. लग्नाच्या दिवशीच ते लंडन फिरण्यासाठी निघून गेले. या विवाहात अमिताभ आणि जयाचे काही नातेवाईक आणि मित्रच उपस्थित होते. लग्न अगदी सोप्या समारंभात पार पडले.