रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 1 जून 2021 (10:38 IST)

पत्नीला मारहाण : या अभिनेत्याला अटक

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिका‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम टीव्ही अभिनेता करण मेहराला आपल्या पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री  करण मेहराला अटक केली आहे.
 
ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात वाद सुरु असताना सोमवारी दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. यांच्या भांडण झालं आणि करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नंतर करणला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली.
 
उल्लेखनीय आहे की करण मेहरा- निशा रावल यांच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या वाद असल्याचे समोर येत होते. तथापि निशाने तेव्हा वाद असल्याचे नकारले होते.
 
करण मेहरा टिव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये लीड भूमिकेत होते. या मालिकेत करणसोबत हिना मुख्य भूमिकेत होती. करण 'बिग बॉस 10' आणि 'नच बलिये 5' यात देखील दिसून चुकले आहे. निशा रावल सध्या टिव्ही शो 'शादी मुबारक' यात दिसत आहे. करण आणि निशाने 2012 मध्ये विवाह केले असून त्यांना कवीश नावाचा एक 4 वर्षांचा मुलगा आहे.