नवी मुंबईत भाजपाला धक्का; मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश
राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच राजकीय घडामोडींनाही जबरदस्त वेग आला आहे. अनेक बंडखोर नेते आपला पक्ष सोडून वेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरू असताना आता भाजपाला मनसेने मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मनसेला अधिक ताकद मिळणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये पडझड पाहण्यास मिळत आहे. भाजपाचे अनेक नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. भाजपाचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनीही आता मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ठाण्यातील शहापूरमध्ये शेकडो शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.