सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:59 IST)

मित्राने साधली मैत्रिणीशी जवळीक, रागाच्या भरात जीव घेतला

नवी मुंबईत एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या ‍मित्रांचा जीव घेतला कारण त्याने लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मैत्रिणीसोबत जवळीक वाढली होती.
 
माहितीनुसार तळवली भागात राहणाऱ्या 19 वर्षीय अनिल शिंदे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. तपासणी घटना कळून आली आणि पोलिसांनी नाशिकहून 19 वर्षीय अनिकेत जाधवला अटक केली. अनिकेतने चौकशीत हत्येची कबुली दिली.
 
अनिकेत नवी मुंबईतील तळवली परिसरात राहत असताना त्याची ओळख एका तरुणीशी झाली होती. पण लॉकडाउनमध्ये तो नाशिकला गेला असताना अनिलने या तरुणीशी मैत्री केली दोघांमध्ये जवळीक वाढत होती ही बाब लक्षात आल्यावर अनिकेतचा राग वाढला. द्वेष असल्यामुळे त्याने अनिल शिंदेंची हत्या करण्याचा कट रचला आणि घणसोलीमध्ये त्याला बोलवून दारू पाजली आणि नंतर कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्यांने अनिलचा मृतदेह घणसोली परिसरात फेकून दिला होता. 
 
या प्रकरणात अनिकेतला एका अल्पवयीन मुलाने मदत केली होती. पोलिसांनी दुसर्‍या मुलालाही ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.