शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (14:05 IST)

आयपीएलबाबत आज निर्णय : बीसीसीआयची मुंबईत लक्षवेधी बैठक

आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-20 वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची आज 29 मे रोजी विशेष बैठक (एसजीए) आयोजिली आहे. या बैठकीसाठी बीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
 
भारत कोरोना व्हायरसच्या दुसर्याय लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेले आहेत. यंदा भारतात टी-20 क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे आणि बीसीसीआय या स्पर्धेची तयारी करत आहे. ऑक्टोबरनोव्हेंबरध्ये भारत या स्पर्धेचे आयोजन करेल. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत या स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने ही बैठक बोलावली आहे.
 
वर्ल्ड कपसोबतच या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (2021-22) चर्चा होणार आहे. देशातील कोरोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 29 मे रोजी होईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.
 
मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे. 2020-21 च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेने होऊ शकते.