मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (14:58 IST)

अमृता फडणवीस यांची नव्या गाण्याची घोषणा, शानसोबत आहेत गाणार

amruta fadnavis
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एक गायिका म्हणून देखील स्वतंत्र ओळख आहे. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. सुप्रसिद्ध गायक शान अर्थात शांतनू मुखर्जीसोबत एक डुएट रोमँटिग साँग त्या गाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.
 
अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये हे गाणं ज्या चित्रपटासाठी गायलं जाणार आहे, त्या चित्रपटाचं नाव देखील जाहीर केलं आहे. पंडित ललित यांचं संगीत, संजय चेल यांचे गीत आणि पटकथा असणारा हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात म्हणजे पुढच्याच महिन्यात रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
 
अमृता फडणवीसांनी या चित्रपटाच्या टीमसोबतचे फोटो ट्वीटमध्ये शेअर केले आहेत. “गायक शान यांच्यासोबतच्या माझ्या रोमँटिक गाण्याच्या स्क्रीनिंगच्या वेळची छायाचित्र. हे गाणं विनोदी राजकीय टिप्पणी असणारा आगामी चित्रपट ‘लव्ह यू लोकतंत्र’ मधील आहे. हा चित्रपट आणि त्याचं संगीत ऑगस्ट २०२२मध्ये रिलीज होणार आहे”, असं या ट्वीटमध्ये अमृता फडणवीसांनी नमूद केलं आहे.