रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (17:15 IST)

अनन्या पांडे NCB च्या कार्यालयात दाखल

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात दाखल झाली आहे.
 
आज (20 ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास अनन्या पांडेच्या घरी जाऊन NCB ने तिला समन्स बजावले होतं.
 
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंध समोर आल्यानंतर हे समन्स बजावण्यात आले होते.
 
अनन्या पांडेला चौकशीसाठी आज दुपारी दोन वाजता NCB कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्यासंबंधीची नोटीस तिच्या हाती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
 
अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सध्या अटकेत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप वर काही चॅट आढळून आल्यानंतर NCB ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.
 
आज NCB चं पथक शाहरुख खानच्या मन्नत या घरीही गेलं होतं.
 
अनन्या पांडे ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. 2019 साली 'स्टुडंट ऑफ द यीअर 2' या सिनेमातून अनन्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
 
त्यानंतर 'पती, पत्नी और वो', 2020 मध्ये प्रदर्शित झालेला 'खाली पीली' या सिनेमांमध्ये ती झळकली. तर आगामी वर्षभरात अनन्याचे आणखी 3 सिनेमे येऊ शकतात.