शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 एप्रिल 2018 (12:33 IST)

आता अनुष्का कॉमेडी चित्रपटात अजमावणार नशीब?

अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत प्रत्येक शैलीतील चित्रपट बनवताना दिसून येते. तिच्या प्रॉडक्शन हाऊसध्ये बनलेला अखेरचा चित्रपट परी एक हॉरर सिनेमा होता, परंतु आता अनुष्का कॉमेडीध्येही नशीब अजमावून पाहणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच अनुष्का आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनणार्‍या तीन चित्रपटांची घोषणा करणार आहे व तीनही चित्रपट वेगवेगळ्या शैलीतील आहेत. यापैकी एका चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्णतः कॉमेडीवर आधारित आहे, ज्याविषयी अद्याप फार काही खुलासा झालेला नाही, परंतु या चित्रपटातही अनुष्का स्वतः अभिनय करणार असून त्याचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. मुळात सध्या अनुष्का आपल्या अनेक चित्रपटांमध्ये बिझी आहे. त्यामुळे आपल्या प्रॉडक्शन अंतर्गत बनत असलेले चित्रपट तिने पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकले आहेत. गेल्या वर्षी फिल्लौरी व जब हॅरी मेट सेजलसारख्या दोन चित्रपटांमध्ये दिसून आलेली अनुष्का या वर्षीही अलीकडेच परी या चित्रपटामध्ये दिसून आली होती. तर आता ती झिरो, तसेच सुई धागासारख्या चित्रपटांमध्येही पाहायला ळिणार आहे.