शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (11:19 IST)

मलायकाला खटकते अर्जुनची ‘ही' सवय

कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या सगळीकडे लॉकडाउन सुरू आहे. प्रत्येकाला घरातच राहावे लागत आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. सध्या सगळ्या चित्रपटांचे शूटींग देखील बंद आहे. या दरम्यान प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला वेळ घालवत आहे. आणि ते या लॉकडाउनच्या काळात काय करत आहेत याची माहिती सोशल मीडियावरुन देत आहेत.

दरम्यान, अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर ‘टू डू' हा गेम सुरू केला. आणि त्यातून मलायकाला अर्जुनची कोणती सवय आवडत नाही हे समोर आले आहे.

लॉकडाउन दरम्यान अर्जुन कपूर घरी आहे. तो चाहच्यांची सोशल मीडियावरुन संवाद साधत असतो आणि त्यांना एंटरटेन करत असतो. असेच त्याने इन्स्टाग्रामवर टू डू हा गेम खेळायला सुरूवात केला. त्यादिवशी त्या खेळाडूने काय कराचे नाही हे त्या खेळाच्या माध्यमातून सांगितले जाते.

या गेममध्ये अर्जुनला ‘आपला फोनवापरणे बंद करा' असे उत्तर मिळाले. त्यानंतर मलायका अरोराला टॅग करत अर्जुनने हे आपल्या इन्स्टाग्रामच्या  स्टोरीमध्ये शेअर केले आणि ‘याच्याशी सहमत असणार्‍या आणखी एका व्यक्तीला मी ओळखतो' असे त्याने म्हटले. त्यामुळे अर्जुनचे सतत फोन वापरणे मलायकाला आवडत नसावे हे कळून येते.