मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (09:25 IST)

सनी लिओनी, दिलजीत जोडीचं 'अर्जुन पटियाला'तील 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा'

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि दिलजीत या जबरदस्त जोडीचं 'अर्जुन पटियाला'तील 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. इंटरनेटवर या गाण्याची चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. गाण्याला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 
 
'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' हे पार्टी सॉग्न आहे. 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातील या गाण्यामध्ये दिलजीत आणि सनीशिवाय कॉमेडियन वरुण शर्माही थिरकताना दिसत आहे. 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' हे गाणं पंजाबी सिंगर गुरु रंधावाने गायलं आहे. एवढंच नाही तर गुरु रंधवाने हे गाणं लिहिलंही आहे. 'बेबी डॉल' गाण्यानंतर आता 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा'मधून सनी पहिल्यांदाच आयटम सॉग्नमध्ये झळकली आहे.