शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 18 एप्रिल 2021 (12:01 IST)

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह

राज्यात सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलीवूडचे देखील अनेक दिग्गज करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. त्यात आता अभिनेता अर्जुन रामपालला करोनाची लागण झाली आहे. त्याने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली.
 
अर्जुन रामपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत म्हटलं की “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जरी मला करोनाची लक्षणे दिसतं नसली तरी मी घरात आयसोलेशनमध्ये राहत आहे, मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या १० दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72)

अजुर्न रामपालने म्हटलं की ही वेळ आपल्या सगळ्यांसाठी भयावह असली तरी आपण थोडावेळ शांत आणि जागरूक राहिलो तर आपल्याला फायदा होईल. एकत्रितपणे आपण नक्कीच करोनाशी लढू शकतो,” अशा आशायची पोस्ट अर्जुनने केली आहे. 
 
अर्जुनची पोस्ट पाहताच चाहत्यांनी प्रार्थनांचा वर्षाव केला आहे. दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.