बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हो... कोहलीने मारले आहे काजोलच्या बहिणीला

सध्या चर्चा आहे ती  कोहलीची. विराट नाही तर अरमान कोहलीची. मैत्रिणीला जबर मारहाण करून तिला जखमी करणाऱ्या अभिनेता अरमान कोहलीला तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाने नाही सागितले आहे. यात उपरांत भयानक  बाब म्हणजे काजोलची बहीण तनीषा हिला देखील कोहली मारहाण करायचा अशी माहिती आता चर्चेत आली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट विश्वात खळबळ माजली आहे.

यामध्ये  ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या एका मुलाखतीत अरमान कोहलीची लिव्ह इन पार्टनर निरू रंधवाने हे सर्व उघड केले आहे. ‘अरमानने तनीषावर हात उचलला होता. मला ही माहिती नोकरांनी दिली. तसेच त्या दोघांच्या मित्रांनी देखील मला सांगितलं की अरमान तिला अनेकदा मारहाण करायचा.’ असे तिने सांगितले आहे. 

तनीषा आणि अरमान बिग बॉस- ७मधून एकमेकांच्या जवळ आले होते. टीव्हीवर देखील त्यांची जवळीक पाहायला मिळाली होती. या अफेअरमुळे काजोल आणि तिची आई अपसेट होत्या. बिग-बॉस संपल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र आता हे सर्व प्रकरण समोर आले असून तनिशा सावध पवित्रा घेईल असे तरी चित्र आहे.