शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (10:04 IST)

Art director Milan Fernandez Passes Away: कला दिग्दर्शक मिलन फर्नांडिस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

milan art director
Art director Milan Fernandez Passes Away:  गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत एक दु:खद बातमी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी 'ताल' फेम अभिनेत्री भैरवी वैद्य हिच्या निधनाची बातमी समोर आली होती. तर रविवारी म्हणजेच 15ऑक्टोबरला तमिळ सिनेमाचे कला दिग्दर्शक मिलन फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे.

दिग्दर्शकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ते सध्या  अझरबैजानमध्ये सुपरस्टार अजित कुमारच्या आगामी 'विदामुयार्ची' या चित्रपटावर  काम करत होते  . ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिग्दर्शकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी मिलन यांचे निधन झाल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी हॉटेलमध्ये छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. हॉटेलमधून हॉस्पिटलमध्ये जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
 
मिलन यांच्या निधनाच्या वृत्तामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे . त्यांच्या निधनाने सर्वच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मिलन फर्नांडीजचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि 1999 मध्ये त्यांनी तमिळ चित्रपट उद्योगात काम करण्यास सुरुवात केली. मिलनने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. त्यात अजित कुमार आणि थलपथी विजय आणि विक्रम यांच्या नावाचा समावेश आहे.मिलनने बहुतेक वेळा अजित कुमार सोबत काम केले आहे, ज्यात 'सिटिझन', 'रेड और व्हिलन', 'थामीजान' थलपथी विजय आणि चियान विक्रमचा 'अन्नियां' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
 
त्यानंतर 2006 मध्ये 'आर्य' चित्रपटातून त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. नंतर त्याने 'बिल्ला', 'वेट्टाईकरण', 'थुनिवू', 'विवेगम', 'वेदलम' आणि 'सामी 2' सारख्या काही हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे निधन झाले तेव्हा कला दिग्दर्शकाने टीमसोबत शूटिंग पूर्ण केले होते. मिलन यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे.
 




Edited by - Priya Dixit