संबंधित माहिती
- Pune : महाविद्यालयात शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
- Pune News सहायक पोलीस आयुक्ताकडून पुण्यात पत्नी आणि पुतण्याचा गोळी झाडून खून, स्वत:ही केली आत्महत्या
- Pune: पत्नी आणि पुतण्याची गोळी मारून हत्या करून स्वतः आत्महत्या केली
- मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या
- पतीच्या आत्महत्येनंतर आता आई, मुलाने केली आत्महत्या
Nitin Desai:नितीन देसाईंची स्टुडिओमध्ये आत्महत्या
Twitter
नितीन देसाई यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, देवदास, खाकी, स्वदेश यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केले. 2000 मध्ये हम दिल दे चुके सनम आणि 2003 मध्ये देवदाससाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याशिवाय हरिश्चंद्र फॅक्टरी या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.
नितीन देसाई हे बॉलीवूडमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करायचे, त्याशिवाय ते मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते. नितीन देसाई मराठी चित्रपट दिग्दर्शनासोबतच चित्रपटांची निर्मितीही करत असत. इतकंच नाही तर त्याने काही चित्रपटांमध्ये स्वत: अभिनयही केला आहे.
